शोक हा संपत नाही जात वैफल्याची उमगत नाही क्षणात हास्याचे अश्रू होतात जणू सुख माझ्या पदरातच नाही कर्तव्याची वाट थांबत नाही ह्या उन्हाच्या सावलीत माझं घरटंच नाही उसवलेला धागा माझा प्रेमाचा जणू बांधण्याची त्याची रीतच नाही भरारी माझी गरुडाची अन् नाऴ अशांशी तुटतच नाही शहामृगाचे पंख हे ज्यांचे उड्डाणाचा ज्यांना गंधच नाही त्या सूर्याचीही होते फसगत धरणी त्याला दिसतच नाही येतो आडवा चंद्रमा कुणी जसे ग्रहण माझे सुटतच नाही
Posts
Showing posts from January 19, 2020