प्रीत तुझी अनंत काळापासून अनंत काळापर्यंत प्रतीक्षेच्या पहाटेपासून आशा निराशेच्या हिंदोळ्यापर्यंत तू नव्हतास तेव्हापासून तुझे असणे माझ्यात भिनेपर्यंत पहिल्या कटाक्षापासून तुजविन मी मला न दिसेपर्यंत स्पर्शाच्या आतुरतेपासून श्वासांच्या मिलनापर्यंत शब्दाच्या छुप्या अर्थापासून मूक परिणयापर्यंत मी मला जाणवल्यापासून फ़क्त तू उरेपर्यंत प्रीत तुझी व्यापलेली माझ्या स्पंदनांपासून त्या दूर क्षितिजापर्यंत
Posts
Showing posts from May 29, 2022