प्रीत तुझी
अनंत काळापासून
अनंत काळापर्यंत
प्रतीक्षेच्या पहाटेपासून
आशा निराशेच्या हिंदोळ्यापर्यंत
तू नव्हतास तेव्हापासून
तुझे असणे माझ्यात भिनेपर्यंत
पहिल्या कटाक्षापासून
तुजविन मी मला न दिसेपर्यंत
स्पर्शाच्या आतुरतेपासून
श्वासांच्या मिलनापर्यंत
शब्दाच्या छुप्या अर्थापासून
मूक परिणयापर्यंत
मी मला जाणवल्यापासून
फ़क्त तू उरेपर्यंत
प्रीत तुझी व्यापलेली
माझ्या स्पंदनांपासून त्या दूर क्षितिजापर्यंत
अप्रतिम 👌👌
ReplyDelete❤️
Delete